परमेश्वरी इच्छा, नियम आणि कृपा यांपैकी आपल्याला फक्त कृपा हवी असते, पण परमेश्वरी इच्छा आणि नियमांशिवाय कृपा मिळू शकत नाही
जेवढ्या प्रमाणात भक्ती तेवढ्या प्रमाणात शांतता, आणि जेवढ्या प्रमाणात शांतता तेवढ्या प्रमाणात स्थैर्य तेवढ्याच प्रमाणात परमेश्वरी कृपा. म्हणजेच जेवढ्या प्रमाणात भक्ती तेवढ्या प्रमाणात परमेश्वरी कृपा.
माझे आहार, विहार, आचार, विचार कसे आहेत ह्यावरच माझ्यावरील परमेश्वराची कृपा अवलंबून असते
परमेश्वरी मन म्हणजे माझ्या बाह्य मनावर परमेश्वराचा अंमल नीट चालू देतो तो मनाचा हिस्सा. जेवढ्या प्रमाणात परमेश्वरी मन माझ्याकडे विकसित होते तेवढ्या प्रमाणात माझ्या आयुष्यामध्ये परमेश्वरी कृपा मला प्राप्त होते