मी ज्या प्रमाणात भक्ती व सेवा करेन, ज्या प्रमाणात चांगले वागण्याचा प्रयत्न करेन, त्या प्रमाणात माझ्या आयुष्यात अधिकाधिक चांगल्या गोष्टी घडत राहतील
मानवाला मानवी प्रयत्नाने टाळता येऊ शकत नाहीत असे जे ३-४ प्रकारचे मृत्यु मानवाच्या आयुष्यामध्ये येऊ शकतात त्यांना आम्ही गंडांतर म्हणतो. हे परमेश्वरच टाळू शकतो म्हणजेच माझी भक्तीच टाळू शकते
माझ्या चांगल्या आचरणाने माझ्याकडे चांगली भक्ती येते. चांगल्या भक्तीने चांगले प्रयत्न व्ह्यायला लागतात.चांगल्या प्रयत्नाने माझे कर्म अधिक चांगले होते.
कुठलंही संकट आलं की घाबरून जाऊ नका. जेवढं संकट मोठं तेवढी मोठी भक्ती माझी झाली पाहिजे. तेवढे माझे प्रयत्न अधिक मोठे झाले पाहिजेत.