माझ्या मनाला शांत, एकचित्त करणे तसेच ज्याच्यामधून मांगल्य उप्तन्न होईल, आनंद निर्माण होईल असा विचार करणे हीच मनाला दिलेली सगळ्यात मोठी विश्रांती होय.
परमेश्वरी मन म्हणजे माझ्या बाह्य मनावर परमेश्वराचा अंमल नीट चालू देतो तो मनाचा हिस्सा. जेवढ्या प्रमाणात परमेश्वरी मन माझ्याकडे विकसित होते तेवढ्या प्रमाणात माझ्या आयुष्यामध्ये परमेश्वरी कृपा मला प्राप्त होते
अन्यायाचा प्रतिकार करायचा असेल तर प्रथम मनाने, शरीराने आणि बुद्धीने आम्हाला समर्थ व्हायला हवे.
जीवनात घडलेल्या चुका स्वत: मन:पूर्वक लक्षात घेऊन त्या बदलण्याचा दृढनिश्चयाचा मार्ग म्हणजे प्रायश्चित! मन, बुद्धी आणि कृती या तिन्हींची शुद्धी म्हणजेच प्रायश्चित.
मी मनापासून सेवा करायचा प्रयत्न केला तर मला माझा सद्गुरु प्राप्त होणारच आहे