मन आणि बुद्धी जिथे एकत्रित कार्य करतात अशी जागा म्हणजे अंत:करण. हीच माणसाची सर्वात मोठी संपत्ती आहे कारण अंत:करणच मनुष्याला संपूर्ण शक्ती, सामर्थ्य देऊ शकतं!
अन्यायाचा प्रतिकार करायचा असेल तर प्रथम मनाने, शरीराने आणि बुद्धीने आम्हाला समर्थ व्हायला हवे.
जीवनात घडलेल्या चुका स्वत: मन:पूर्वक लक्षात घेऊन त्या बदलण्याचा दृढनिश्चयाचा मार्ग म्हणजे प्रायश्चित! मन, बुद्धी आणि कृती या तिन्हींची शुद्धी म्हणजेच प्रायश्चित.