माणसाचा आनंद फक्त घटनेवर किंवा क्रियेवर अवलंबून नाही, तर त्या घटनेच्या इष्ट-अनिष्टतेवर अवलंबून असतो.
माझ्या मनाला शांत, एकचित्त करणे तसेच ज्याच्यामधून मांगल्य उप्तन्न होईल, आनंद निर्माण होईल असा विचार करणे हीच मनाला दिलेली सगळ्यात मोठी विश्रांती होय.
जोपर्यंत मी प्रेम करायची कला शिकत नाही तोपर्यंत जो प्रेमाचा महासागर आहे आणि सत्य, प्रेम व आनंद हेच त्याचे फक्त गुण आहेत त्या, गुरुतत्त्वाला / सद्गुरुतत्त्वाला मी ओळखू शकत नाही
पूर्ण सत्याच्या व प्रेमाच्या मार्गाने संपूर्ण आनंदाची प्राप्ती म्हणजेच यश! म्हणूनच सत्य, प्रेम, आनंद एकत्र म्हणजेच यश.