काही माणसे थोडसे जरी संकट आले तरी घाबरून जातात, तर काही माणसे कितीही मोठे संकट आले तरी तोंड देतात; ही संकटांना न डगमगता, न घाबरता, न वाकता, न मोडता तोंड देणारी माणसे म्हणजे भक्त
कुठलंही संकट आलं की घाबरून जाऊ नका. जेवढं संकट मोठं तेवढी मोठी भक्ती माझी झाली पाहिजे. तेवढे माझे प्रयत्न अधिक मोठे झाले पाहिजेत.
ज्या क्षणाला आपण संकटातून बाहेर पडलो आहोत अशी भावना मनात उत्पन्न होते तो क्षण माझ्या आयुष्यात मी कायम जपून ठेवायला हवा.
देवाचे नामस्मरण कसे करावे आणि संकटांना सामोरे कसे जावे, हे सामान्य माणसांना शिकविण्यासाठीच संतांची चरित्रे घडतात
संकटांमध्ये माझ्या मागे परमेश्वर कसा उभा होता व त्यातून माझं कसं चांगलं झालं ह्याचा मी वारंवार विचार करत राहीन तेव्हाच मी परमेश्वराशी जोडला जाईन