बौद्धिक श्रम व शारीरिक श्रम दोन्हीही अगदी प्रत्येकासाठी समान प्रमाणात आवश्यक असतात.
‘101वें घाव से पत्थर टूट गया’ - नहीं, यह पहले के 100 घावों का परिणाम है, अन्तिम घाव तो केवल निमित्त है।
कमी वेळात व कमी श्रमात जास्त धन कमविण्याचा मार्ग किंवा आश्वासन म्हणजे 100% भिकेला लागण्याची गॅरंटी.
एखादी गोष्ट मला एखाद्याकडून काही कारणास्तव फुकट मिळाली आणि मी ती नाकारु शकत नसेन तर त्या गोष्टीएवढं मूल्य किंवा त्या मूल्यांएवढे श्रम मला परमेश्वराच्या चरणी अर्पण करता आले पाहिजेत.
श्रम आणि धन दोन्हीचा उचित वापर करायला शिका. कोणाकडून श्रमाच्या बाबतीत किंवा धनाच्या बाबतीत कुठालीही फुकट गोष्ट कधीही घेऊ नका, ती गोष्ट आम्हाला सदैव घातकच ठरते.